Showing posts with label मराठी कविता. Show all posts
Showing posts with label मराठी कविता. Show all posts

Page 18

मैत्री करण्यासाठी नसावं


लागतं श्रीमंत आणि सुंदर

त्याच्यासाठी असावा लागतो

फ़क्त मैत्रीचा आदर



काहीजण मैत्री कशी करतात?

उबेसाठी शेकोटी पेटवतात अन

जणू शेकोटीची कसोटी पहातात.

स्वार्थासाठी मैत्री करतात अन

कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.

शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?

दोन्हीपण एकच जाणवतात.



मैत्री करणारे खूप भेटतील

परंतू निभावणारे कमी असतील

मग सांगा, खरे मित्र कसे असतील?



कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात

कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात



या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?

नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला.

Page 17

होय, मी मराठी आहे.



मी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला आहे.


मी मराठीचा आणि महाराष्ट्राचा कट्टर समर्थक आहे.






लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी


जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी


धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी


एवढया जगात माय मानतो मराठी






आमुच्या मनामनात दंगते मराठी


आमुच्या रगरगात रंगते मराठी


आमुच्या उराउरात स्पंदते मराठी


आमुच्या नसानसात नाचते मराठी






आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी


आमुच्या लहानग्यात रांगते मराठी


आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी


आमुच्या घराघरात वाढते मराठी


आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी






येथल्या फुलाफूलात हासते मराठी


येथल्या दिशादिशात दाटते मराठी


येथल्या नगानगात गर्जते मराठी


येथल्या दरीदरीत हिंडते मराठी


येथल्या वनावनात गुंजते मराठी


येथल्या तरुलखात सादते मराठी


येथल्या कळीकळीत लाजते मराठी






येथल्या नभामधून वर्षते मराठी


येथल्या पिकांमधून डोलते मराठी


येथल्या नद्यांमधून वाहते मराठी


येथल्या चराचरात राहते मराठी






पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी


आपुल्या घरीच हाल सोसते मराठी


हे असे कितीक खेळ पाहते मराठी


शेवटी मदांध तख्त फोडते मराठी.

Page 16

पहिला पाऊस पडतो तेंव्हा,
एकच काम करायचं ...
हातातली कामं टाकुन देउन,
पावसात जाऊन भिजायचं !

आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या,
कोसळणार् या धारा,
श्वासांमध्ये भरून घ्यायचा,
सळाळणारा वारा...

कानांमधे साठवुन घ्यायचे,
गडगडणारे मेघ,
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची,
सौदामिनीची रेघ...

पावसाबरोबर पाऊस बनून,
नाच नाच नाचायचं,
अंगणामधे , मोगर् यापाशी
तळं होऊन साचायचं !

आपलं असलं वागणं बघुन,
लोक आपल्याला हसतील,
आपला स्क्रू ढिला झाला,
असं सुध्दा म्हणतील...

ज्यांना हसायचं त्यांना हसू दे,
काय म्हणायचं ते म्हणू दे,
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे,
त्यांचं त्यांना कण्हू दे...

असल्या चिल्लर गोष्टींकडे,
आपण दुर्लक्ष करायचं !
पहिला पाऊस एकदाच येतो,
हे आपण लक्षात ठेवायचं !

म्हणून ...
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं ...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं.

Page 15

प्रेम करणं सोपं नसतं

सर्व करतात, म्हणून करायच नसतं

चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं

पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं

तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं

कारण प्रेम करणं सोपं नसतं

शाळा कॉलेजांत असच घडतं

एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं

जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं

ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं

करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं

सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं

कारण प्रेम करणं सोपं नसतं

हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं

पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं

फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं

मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं

डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं

आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं

एवढ सगळं करणं खुप कठीण असतं

कारण प्रेम करणं सोपं नसतं................

Page 14

मैत्री असावी अशी... मैत्रीसारखी

हसत राहणारी.., हसवत राहणारी...

संकटकाळी हात देणारी...

आनंदी समयी साद घालणारी...

मनाची कवाडे उघडून डोकावणारी...

काहीं गुपितांचे राखण करणारी...

मन मोकळे करुन सारं सांगणारी...

सांगता सांगता मोहीत करणारी...

कधी कुणाला न लुटणारी...

चांगल्याच कौतुक करणारी...

तितकीच चूका दाखविणारी...

शूध्द सोन्याप्रमाणे चम चम चमकणारी...

Page 13

प्रेम करताना विचार नाही केला
मला प्रेम मिळेल का
तू होकार देशील का
तू माझी होशील का
माझ्यावर प्रेम करशील का
माझ्या या निरस जीवनात
नंदनवन फुलेल का
मी फक्त प्रेम केल
मनापासून............ मनावर.............
प्रेम करताना कसला
विचार करायचा नसतो
विचार करून कधी
प्रेम करता येत नाही
मी प्रेम केल
तुझ्या गोड हसण्यावर
तुझ्या शांत बसण्यावर
तुझ्या मनमोकळेपनावर
आणि वेगळ्यावतणर्‍या स्वभावावर
मी प्रेम केल....
तुझ्या मंजुळ बोलण्यावर
मसोळी डोळ्यातील बोलकेपणावर
तुझ्या चेहरयवरील निरागसतेवर
आणि तेवढ्याच शांत मनावर
मी प्रेम केल.....
तुझ्या कधी रागवण्यावर
रागाने लाल झालेल्या त्या नाकावर
लटके नाक मूरडण्यावर
आणि गाळ फुगवून बसण्यावर
मी प्रेम केल.....
तुझ्या ईश्य म्हणण्यावर
तारुण्या सुलभ लाजण्यावर
लाजून झुकनार्‍या नजरेवर
आणि गुलाबी झालेल्या गालावर
मी प्रेम केल.....
तुझ्या स्वप्नावर,ईछा आकांशावर
तुझ्या मनातील भावनांवर
तू सोसलेल्या वेदनांवर
आणि जीवनातील दु:खांवर
मी प्रेम केल.....
तू घेतलेल्या प्रतेक श्‍वासावर
हृदयातील स्पंदणावर
माझ्या आठवणीत तू
जगून काढलेल्या रात्रीवर
मी फक्त प्रेम केल.....
कारण...........
प्रेम फक्त करायच असत
निस्वारथ मनाने,.................
प्रेम फक्त डेयच असत
निरपेक्ष अंत:करणाने.........
मी प्रेम केल.....
मनापासून............ मनावर.............
कधीतरी मलाही असाच प्रेम मिळेल
खर प्रेम करणार कोणीतरी भेटेल
मी फक्त प्रेम केल.....
मलाही फक्त प्रेम मिळाव
मलाही फक्त प्रेम मिळाव.

Page 12

आहेस तू !!!!!!
आहेस तू सावरायला
म्हणून पडायला ही आवडतं ..........................

आहेस तू मनवायला
म्हणून रुसायला ही आवडतं .........................

आहेस तू रडायला
म्हणून रडायला ही आवडतं .................

आहेस तू समजून घ्यायला
म्हणून चुकायलाही आवडतं .........................

आहेस तू पाहायला
म्हणून सजायला ही आवडतं .........................

आहेस तू ऐकायला
म्हणून बोलायलाही आवडतं .....................

आहेस तू सोबतीला
म्हणूनच जगायलाही आवडतं ................... !!!

Page 11

मी....

मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...

अगदी एखाद्या कवीतेसारखा,
आवडली तर ऐका नहितर नीघून जा...

कुणालही सांगणार नाही,जबरद्स्ती तर मुळीच नाही,
समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा...

तुम्ही जगताय ते योग्य अन् मझ जगण अयोग्य,
जरा असही जगून बघा निश्फळ वाटल तर नावं ठेवा...

तुमच्या आध्यात ना मध्यात ना मझा कुणाला त्रास,
कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच सन्ताप्ताय...

करावस वाटलं तर एकच् करा
मी जगतोय तस मला जगू द्या...
का नवं ठेवता उगाच
मी करतोय ते मला करु द्या...
म्हणूनच म्हणतो..

मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...

Page 10

मराठी मुलगी

College मधे अनेक mod मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.

College मध्ये मुली short top घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,
ती मुलगी मराठी असते.

College मध्ये मुली jeans घलुन येतात,
पण जी jeans बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.

College मधे अनेक मुली असतातपण,
वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते,
ती मुलगी मराठी असते.

कॉलेजमधे अनेक मुली असतात,
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते,
ती मुलगी मराठी असते.

शॉपींगलाही अनेक मुली जातात,
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते,
ती मुलगी मराठी असते.

Page 9

एकदा "PMT" मध्ये प्रवास करतांना एक सुंदर गोड अप्सरा मला दिसली CONDUCTOR च्या सीट वर ती कोप-यात एकटीच होती बसली --------------------------------- मोकळी जागा पाहुन मी माझी "तशरिफ" तेथेच ठेवली मला पाहताक्षणीच तिने आपली पर्सच उचलुन ठेवली -------------------------------- उघडया खिडकितुन वारा तसा फ़ारच जोरात येत होता तिच्या ओढनीला माझ्या चेह-यावर हळुवार उडवीत होता -------------------------------- ती मात्र ओढनी सावरत सावरत स्वत:शीच गुनगुनत होती नकळत दोघातील अंतर कमी करन्यासाठी मला हाथभार लावत होती -------------------------------- तेवढ्यात बसच्या धक्क्याने आमच्या दोघांतील अंतर कमी केले एका मिनीटासाठी का होईना मला स्वप्नाच्या दुणियेत नेले -------------------------------- येवढ्यात CONDUCTOR माझ्याजवळ आला लेडिज सीट सांगुन मला उठवुन गेला तेव्हा त्या मेल्याचा राग भलताच आला स्वप्नाचा माझ्या त्याने चुराडाच केला ---------------------------------- मग पुढच्या STOP वर उतरन्यासाठी ती तीची PURSE सावरायला लागली गर्दित मला खेटत खेटत स्वत:ची वाट काढु लागली --------------------------------- खाली उतरताच माझी नजर एकटक तिला शोधु लागली ती मात्र BOYFRIEND च्या गाडीवर बसुन केव्हाचीच हवेशी बोलु लागली --------------------------------- आमच्या महालात रानीची जागा नेहमी अशीच खाली असते आम्हाला आवडलेली रानी जेव्हा तेव्हा "ENGAGE"च असते ---------------------------------

Page 8

जीवनाच्या प्रवाहातअनेक माणसं भेटतात,

काही आपल्याला साथ देतातकाही सांडून जातात........

काही दोन पावलेच चालतात,

आणि कायमची लक्षात राहतात,

काही साथ देण्याची हमी देऊन,

गर्दीत हरवून जातात........

नाती जपता जपता तुटणारनवीन नाती जुळत राहणार,

आयुष्य म्हटले तर,

हा प्रवाह असाच चालत राहणार........

पण् कुणी दूर गेले तरजगणेही थांबवता येत नाही,

कारण ह्या अथांग सागरातएकटे पोहताही येत नाही.............

Page 7

नजरेचे SMS..

आज जरा छपरी मूड होता म्हणुन ..
एक छपरी कविता ....

नखरेल इम्पोर्टेड smile तुझ,
मॉडर्न आर्ट सारख वाटल,
सांगायच असेल एक तुला ,
मला भलतच काहीतरी वाटल .

नेहमीच तुझा तो भड़क make-up,
माझा पण नुकताच झालेला break-up,
तुझ त्या hi-fi अदांनी,
मूड माझा झाला wake-up.

मित्र म्हणतात तू STD-ISD,
पण local च परवडतो मला,
म्हणुन आता मी दुरूनच ,
नजरेचे SMS पाठवतो तुला .

Page 6

मुली लग्न का करतात.................

1) एकातरी पुरुषाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी........

2) गुलाम ठेवणे बेकायदेशीर आहे म्हणून......

3) जीवन अर्थपूर्ण बनवण्यासाठी एक फायदेशीर गुंतवणूक म्हणून........

4) पुरूष किती वाईट असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन रडण्यासाठी.................

5) आई-बापावर दया करण्यासाठी.......

6) मैत्रिणीने केले मग मी का नको ...........?

7) नवीन-नवीन डिज़ाइनची मंगळसूत्रे घालवयास मिळावी म्हणून..........

8) नवराच्या जिवावर मुलांची हौस भागवता यावी म्हणून..................

9) मुक्त होण्यासाठी लग्नच केले नाही तर मुक्ती कोनापासून मिळविणार................

10) आपल्या पाक कृतीचे भन्नाट प्रयोग ज्याच्या वर बिनबोभाट करता यावेत असा हक्काचा बकरा मिळण्यासाठी.............

11) लग्नानंतर मुली उजळतात म्हणे............ फअरनेस क्रीम फासून फासून थकल्यावर शेवटचा एक जालिंम उपाय म्हणून

मराठी

अंगणभर विखुरलेल्या गुलमोहोराच्या लालजर्दपाकळ्यांतून हलकेच पावलं टाकतानाहीतुला कसेसे होईपहिल्या पावसाच्या धुंद वृष्टीत सचैल भिजतानातुझ्या नसानसातून आनंदाचे हुंकार उमटतदूरदूरुन आलेल्या गीतलहरींनी तुझ्याछातीतले इमानी दु:ख भरभरुन वाहू लागे. एकदा सोनेरी संधीप्रकाशात झळ्झळती केतकीसाडी नेसून गच्चीवर मी तुझ्यासमोर आलेतेव्हा एकटक न्याहाळत कवितेतल्यासारख तूम्हणाल होतास, "आता मी कोणता संधीप्रकाश पहायचा ? " हे सारे उद्याही तसेच असेल....... ऋतुचक्राचे आस आपल्या गतीने फिरत राहतीलसंधीप्रकाशाचा सोनेरी लावण्यात अवघा आसमंतन्हाउन निघेल. आणि पहिल्या पावसाच्या बेभान वृष्टीत धरतीचाकण न् कण पुळकीत होउन नाचू लागेलहे सारे तसेच असेलफक्त तू नसशील......... तू नसशीलमात्र गुलमोहोराच्या ओसडंत्या पाकळ्यांतून वेदनेचीलालजर्द आसवं तुझ्या आठवणीसाठी वाहतच राहतील.

एक तरी मैत्रीण असावी

एक तरी मैत्रीण

असावीबाईकवर मागे

बसावीजुनी हीरो होंडा

सुद्धा मगकरिझ्माहून

झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण

असावीचारचौघीत उठून

दिसावीबोलली नाही

तरी निदानसमोर बघून

गोड हसावी !

एक तरी मैत्रीण

असावीकधीतरी सोबत

फिरावीदोघांना एकत्र

पाहूनगल्लीतल्या सगळ्या

पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण

असावीजिच्याशी निर्मळ

संवाद असावाकधीतरी

छोट्या भांडणाचाएखादाच

अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण

असावीआयुष्याच्या अनोळखी

वळणावरतुमच्या व्यथा

वेदनांवरतिने घालावी

हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण

असावीजिच्या मैत्रीत

विश्वास रुजावातुमचासुद्धा

खांदा कधीतिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण

असावीचांदणीसारखी मैत्रीच्या

आकाशातमित्रांचे दिवे

मावळले म्हणजेचालावं

पुढे तिच्याच प्रकाशात...

आलाय प्रेम

आलाय प्रेम आणि विश्वासाचा हा उत्सव गुलाबी..

आनंदाचे इन्द्रधनु उमटो तुझ्या आयुष्याच्या नभी..

प्रेमाने सजो तुझे जीवन..

जसे पारिजातकाच्या सडयाने फुलते अंगण..

मिळो तुला ती नजर,जी करेल तुझ्या ह्रदयात घर..

साथ निभाव नेहमीच,नको करु दुनियेची फिकर..

गुलाब आणि गिफ्ट्स ही होतील जुने..

अंतकरणातून साद दे,जोड तू मने..

स्वीकार तू नकार ही,जे असेल तुझे..

ते तुला मिळेलहीऐक पण..

'प्रेम दिन' जरी एक दिवसाचा..

'ख-या' प्रेमाचा उत्सव जीवनभराचा..

अजुनही आठवतयं मला

अजुनही आठवतयं मलातो लिंबोणीच्या फांदीचा झुलात्यावर बसून हसत म्हणायचीस... "मुर्खा, बघतोस काय झुलव ना मला.."अजुनही आठवतयं मलातो तुला आवडणारा पाऊसमला विसरून म्हणायचीस, "पावसा, बघतोस काय चिंब भिजव ना मला.."अजुनही आठवतयं मला,तुला आवडणारं ते फुलपाखरूत्याकडे हात लांबवत म्हणायचीस.. "पाखरा, बघतोस काय तुझ्या पाठीवर घे ना मला"अजुनही आठवतयं मला,तुला आवडणारं ते बेडकाच पोहणंत्याला हुश्श करून म्हणायचीस.. "बेडका, पाण्याचा ठाव कुठे आहे सांग ना मला"..अजुनही आठवतयं मला,तुला आवडणारं ते सोनचाफ्याच झाडं,त्याला पाहुन लाजून म्हणायचीस.. "चाफ्या, माझ्या लग्नात तुझ्या फुलांची माळ घालीन त्याला.."अजुनही आठवतयं मला,तुला आवडणारा तो बर्फाचा गोळा..तो खाताना ओठांवरून जिभ फिरवत म्हणायचीस.. "गोळावाल्या, अजुन थोडासा गोड कर ना याला"अन आजसुद्धा तु तशीच आहे,हे पानीपुरी खाताना पाहीलंअन तेव्हा माझं मन खरचं,तुझ्या त्या छकुल्या कुशीला कवटाळत राहीलं.मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही आता सांभाळायला हवामैत्रि एक धर्म... यास दोघांनीही पाळायला हवायेणारे येतात अन जाणारे जातातही... मैत्रि सगळ्यांशीच होत नाहीमैत्रि सहज होवुन जाते ... करायची ठरवली तरी ती करता येत नाहीतुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...म्हणुनच वाटतं...तुझ्या माझ्या मैत्रिला भय नाही.

टपरी

सन्ध्याकाळची वेळ, सगळे जमायचो,

काँलेज सुटलेकी इकडेच यायचो,

वरती छत नाही, फ़टक्या भीन्ति,

दोन चार तुटक्या बाकडी,

अश्या तुटक्या फ़ुटक्या विसाव्याच्या जागेला अम्ही 'टपरी' म्हणायचो.

पास, नापास तर कधि अभ्यासाला न्याय,

शेरो शयरी टवाळक्या तर कधी प्रेमचे अध्याय,

ह्या सगळ्या गोष्टिऩ्वर एकच उपाय, सिगारेट का धुआ और उधार की चाय.

मुव्हि, नाटक, पिकनिकचे तर प्ल्यान बनवीले डिस्कोथेकचे,

कधि बर्थडे बम्प्चे तर अस्वाद घेतले कधि केकचे,

इथेच पराक्रम केलेत आम्ही पोरगी पटविण्याचे,

तर भान्डणात नकाशेही बदलीविलेत अनेकान्चे.

उन्हाळे, पावसळे,हिवाळे गेले,आणी टपरी प्रेम आमचे वाढतच गेले,

पण एक दिवस टपरी सोडावी लागेल,या विचाराने मन रडू लागले.

वेळ बदलला काळ बदलला, मीत्रान्चा आता साथ सुटला,

मनात इथली फ़क्त आठवण आहे,आम्ही नसलो तरी काय झाले,

टपरी अजुणही तशीच सदाबहार आहे.